APMCत वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक, स्वच्छता विभागात बिल काढण्यासाठी कंत्राटदाराकडे १५ टक्क्यांची मागणी

ACB Action In APMC Market: नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये एसीबी पथकाने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये लाच घेताना वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
ACB Action In APMC Market

ACB Action In APMC Market

ESakal

Updated on

नवी मुंबई : नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एपीएमसीमध्ये मोठी कारवाई करत स्वच्छता विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक लाख ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणात घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता विभागाचे प्रभारी उपसचिव डॉ. दीपक आवटी आणि अभियांत्रिकी विभागातील जनरेटर ऑपरेटर तसेच प्रभारी स्वच्छता निरीक्षक समीर म्हात्रे यांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com