

navi mumbai municipal corporation
ESakal
नवी मुंबई : शहराचा विस्तार आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लक्षात घेता सिडकोकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिमलेस उन्नत रस्ता (कोस्टल रोड) तसेच दोन महत्त्वाच्या मेट्रो मार्गांच्या सविस्तर प्रकल्प अहवालास नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. याप्रसंगी सादरीकरण करण्यात आले; मात्र सविस्तर चर्चेसाठी हा विषय स्थगित ठेवण्यात आला. या प्रकल्पांमुळे शहराच्या वाहतूक पायाभूत सुविधांना नवी दिशा मिळणार असून प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाचणार आहे. महापालिकेच्या सभेत या प्रकल्पांचे स्वागत करतानाच स्थानिक मच्छीमार बांधवांचे हित जपणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत नगरसेवकांनी व्यक्त केले.