esakal | नवी मुंबईत ५२ टक्के ज्येष्ठ नागरिकांना लसकवच | corona vaccination
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

नवी मुंबईत ५२ टक्के ज्येष्ठ नागरिकांना लसकवच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशी : कोरोना लसीकरणाला (corona vaccination) सुरुवात झाल्यानंतर आरोग्य सेवकांनंतर प्राधान्याने ज्येष्ठ नागरिकांना (senior citizen vaccination) लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र अद्याप त्यांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. नवी मुंबईत दोन्ही मात्रा घेतलेल्या (two dose) ज्येष्ठ नागरिकांची संख्या ५२ टक्के आहे. तर एक मात्रा (first dose) घेतलेल्यांची संख्या ६० टक्केपर्यंत गेली आहे.

हेही वाचा: दागिना बाजार येथे बंगाली बांधवांच्या रक्तदानाने ३११ युनिट रक्त संकलन

कोरोना प्रादुर्भावाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिक व इतर आजार असलेल्या रुग्णांना अधिक असल्याचे आतापर्यंतच्या प्रादुर्भावावरून स्पष्ट झाले आहे. नवी मुंबईत आतापर्यंत १,९२९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात १,०७६ मृत्यू हे ज्येष्ठांचे झाले आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. त्यानुसार करोना लसीकरण सुरू झाल्यानंतर प्राधान्याने ज्येष्ठ नागरिकांना लस देणे सुरू करण्यात आले होते.

हेही वाचा: मुंबई: वर्तमानपत्राचे महत्त्व सांगणाऱ्या वह्यांची विद्यार्थ्यांना भेट

नवी मुंबई एकूण लसीकरणपात्र नागरिकांची संख्या १० लाख ८० हजार असून त्यात दीड लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यापैकी ९१ हजार ३७३ जणांना पहिली मात्रा तर ७९ हजार ४१६ जणांना दोन्ही लसमात्रा आतापर्यंत मिळालेल्या आहेत. म्हणजे पहिली मात्रा ही ६० टक्के तर दोन्ही मात्रा घेतलेल्यांची टक्केवारीही ५२ टक्के आहे.

ज्येष्ठांच्या मृत्यू
६१ ते ७० : ५७०
७१ ते ८० : ३७४
८१ ते ९० : १३९
९१ ते १०० : १५

शहरातील ज्‍येष्‍ठांची संख्या - १.५० लाख
दोन्ही डोस - ७९ हजार ४१६
पहिला डोस - ९१ हजार ३७३

loading image
go to top