

Navi Mumbai Crime
ESakal
नवी मुंबई : नाशिकच्या अशोक खरात प्रकरणाची राज्यभरात चर्चा सुरू असताना, नवी मुंबईतही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. ‘इस्रो’मध्ये वैज्ञानिक असल्याचे सांगत उच्चशिक्षित महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या एका भामट्याला नवी मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. आदर्श म्हात्रे (वय २१) असे आरोपीचे नाव असून, विविध नावांचा वापर करून, त्याने डझनभर महिलांचे लैंगिक आणि आर्थिक शोषण केल्याचे समोर आले आहे.