नवी मुंबई : एकतर्फी प्रेमातून चिमुकल्‍याचे अपहरण; ५ तासांतच आरोपीला अटक

culprit arrested
culprit arrestedsakal media

नवी मुंबई : लग्न करण्यास नकार देणाऱ्या तरुणीच्या चार वर्षाच्या भावाचे अपहरण (kidnaping) करून फरार झालेल्या मजिरुल मसुरुद्दीन हक्क (२५) या आरोपीला (culprit arrested) तळोजा पोलिसांनी (taloja police) अवघ्या ५ तासांत अटक केली. त्याने अपहरण केलेल्‍या मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. कोणतीही माहिती नसताना तळोजा पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करून अवघ्‍या पाच तासांत गुन्हा उघडकीस आणल्याचे परिमंडळ-१चे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे (suresh mengade) यांनी सांगितले.

culprit arrested
अकरावी प्रवेशात अनागोंदी कारभार; विशेष फेरीनंतरही प्रक्रिया सुरू ठेवणार

मसुरुद्धीन हक्क हा तळोजा येथील पेंधर गावात राहात असून त्याच्या घरासमोरच राहणाऱ्या तरुणीवर (२३) तो एकतर्फी प्रेम करत होता. मसुरुद्धीनने तरुणीला लग्‍नाबाबत विचारणा केली होती. मात्र तिने नकार दिला होता. त्यानंतरही तो तरुणीच्या पाठीमागे लग्नासाठी तगादा लावून त्रास देत होता. ७ जुलै रोजी सायंकाळी तरुणी कामावरुन घरी परतत असताना, तळोजा एमआयडीसीमध्ये मसुरुद्दीनने तिला अडवून लग्न करण्यास विचारणा केली. तिने नकार दिल्याने तिला मारहाणही केली होती. तिने लग्न न केल्यास तिच्या चार वर्षीय लहान भावास पळवून जिवे मारण्याची धमकीही दिली होती. मसुरुद्दीनने शुक्रवारी दुपारी तरुणीच्या भावाचे अपहरण करून पलायन केले होते. या बाबत तरुणीने तळोजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मसुरुद्दीन विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

"वरिष्ठ निरीक्षक काशिनाथ चव्हाण व निरीक्षक (गुन्हे) दत्तात्रय किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करून भिवंडी, कल्याण, कुर्ला जंक्शन व सीएसटी जंक्शन अशा वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आले होते. आरोपी भिवंडीत असल्याची व तेथून पळण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक निरीक्षक निकम व त्यांच्या पथकाने मसुरुद्दीनला भिवंडीतील बस थांब्‍यावरून ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यात असलेल्या अपहृत मुलाची सुखरूप सुटका करून आरोपीला अटक केली."

- सुरेश मेंगडे, पोलिस उपआयुक्त, परिमंडळ-१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com