

Navi Mumbai Formula 4 Car Race
ESakal
बेलापूर : सुरुवातीपासूनच विविध वादांच्या भोवऱ्यात सापडलेल्या 'फॉम्र्युला-४' नाईट स्ट्रीट कार रेस स्पर्धेची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. नवी मुंबईतील पामबीच मार्ग आणि अंतर्गत रस्ते अशा एकूण ३.७ किलोमीटर मार्गावर होणाऱ्या या स्पर्धेसाठी सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे. कोट्यवधी रुपये खर्चुन उभारल्या जाणाऱ्या या ट्रॅकसाठी तब्बल १,२०० हून अधिक कर्मचारी दिवसरात्र झटत असून, नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण कामकाज पूर्ण होणार असल्याची माहिती स्पर्धा व्यवस्थापन टीमकडून देण्यात आली आहे.