डिझाइन, शाश्वतता आणि प्रवासी अनुभव... नवी मुंबई विमानतळाचा मोठा सन्मान! ‘जगातील सर्वात सुंदर विमानतळ’ यादीत समावेश

World's Beautiful Airport: एएएचएलच्या नवी मुंबई आणि गुवाहाटी विमानतळांचा प्रिक्स व्हर्सायल्‍सच्या २०२६ मधील जगातील सर्वात सुंदर विमानतळांच्या यादीत समावेश झाला आहे.
NMIA and Guwahati airports added in beautiful airports list

NMIA and Guwahati airports added in beautiful airports list

ESakal

Updated on

मुंबई : अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (एएएचएल) या भारतातील सर्वात मोठ्या खाजगी एअरपोर्ट ऑपरेटरला आर्किटेक्चर आणि डिझाइन क्षेत्रातील जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्‍कार प्रिक्स व्हर्सायल्‍सकडून जागतिक मान्यता मिळाली आहे. कंपनीच्या अंतर्गत येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) आणि गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (एलजीबीआयए) टर्मिनल २ ने २०२६ मधील जगातील सर्वात सुंदर विमानतळांच्या यादीत (वर्ल्‍ड्स मोस्‍ट ब्‍युटिफल एअरपोर्ट्स लिस्‍ट २०२६) स्थान मिळवले आहे. ही मान्यता उत्कृष्ट डिझाइन, शाश्वतता आणि प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या नियोजनाचा गौरव करते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com