

Navi Mumbai Airline Service
ESakal
नवी मुंबई : येत्या २५ डिसेंबरला नाताळच्या सकाळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले उड्डाण करण्याचा मान एअर इंडिगो या विमान कंपनीला मिळाले आहे. तसेच धावपट्टीवर उतरण्याचा पहिला मानही इंडिगो कंपनीला मिळाला आहे. बंगळूरहून येणारे पहिले विमान सकाळी ८ वाजता नवी मुंबई विमानतळावर उतरणार आहे, तर लगेच ८.४० मिनिटांनी इंडिगोचे दुसरे विमान हैदराबादकरिता उड्डाण करेल, अशी माहिती एनएमआयएएलकडून देण्यात आली.