

Morbe Dam Water Stock
ESakal
वाशी : नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्प क्षेत्राची पाहणी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी शनिवारी केली. सध्या धरणात सुमारे ८५ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. संभाव्य कमी पर्जन्यमान लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन आयुक्तांनी केले. तसेच आगामी परिस्थितीनुसार लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करून पाणीपुरवठ्याबाबत नियोजनात्मक निर्णय घेण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.