Diwali Bonus: नवी मुंबईतील कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, राज्यात पहिल्यांदाच ४५ हजार रुपयांचे बोनस मंजूर

NMMC Employees Diwali Bonus: नवी मुंबईतील कर्मचाऱ्यांसाठी ४५ हजार रुपयांचे बोनस मंजूर करण्यात आले आहे. यामुळे नवी मुंबईतील कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
NMMC Employees Diwali Bonus

NMMC Employees Diwali Bonus

ESakal

Updated on: 

नवी मुंबई : पालिकेतील सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि आशा स्वयंसेविकांना यंदा दिवाळीनिमित्त प्रत्येकी ४५ हजार रुपये इतके समान सानुग्रह अनुदान देण्याच्या प्रस्तावाला महासभेने सर्वानुमते मंजुरी दिली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेल्या घोषणेनुसार सभागृह नेते सागर नाईक यांनी मांडलेला हा ठराव महापालिकेत एकमुखाने मंजूर केला. महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांच्या अनुमतीने महापालिकेतील सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, शिक्षक तसेच आशा स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त प्रत्येकी ४५ हजार इतके समान सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याचा ऐतिहासिक ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com