

Navi Mumbai municipal corporation
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सत्तेची हुलकावणी मिळालेल्या शिवसेनेला पुन्हा विरोधी पक्षाच्या बाकावर बसावे लागणार आहे; परंतु यंदा राज्यात पक्षाचा उपमुख्यमंत्री असल्यामुळे शिवसेनेत अधिक ताकद असणार आहे. शिवसेनेतून विरोधी पक्षनेता पदाकरिता कोण दावा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, दरवेळी तोच चेहरा देण्यापेक्षा यंदा तरी नवीन चेहरा शिवसेनेने देऊन एक नवा पायंडा पाडावा, अशी पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे.