

NMMC Mayor Sujata Patil
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या ३० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान झाला आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. आज (ता. ५) झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत ऐन वेळेस शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या महापौर सुजाता पाटील आणि उपमहापौर दशरथ भगत यांची बिनविरोध निवड झाली.