नवी मुंबई महापालिका मुख्यालयात कोरोना, तब्बल 'इतके' कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 July 2020

कोरोनासोबत लढता-लढता महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. एक उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यासह तीन आरोग्य विभागातील अधिकारी आणि दोन कर्मचारी असे एकूण सहा जणांना लागण झाली आहे.

नवी मुंबई : कोरोनासोबत लढता-लढता महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. एक उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यासह तीन आरोग्य विभागातील अधिकारी आणि दोन कर्मचारी असे एकूण सहा जणांना लागण झाली आहे. हे अधिकारी विविध विभागात फिरले असल्याने आता दोन दिवस महापालिका मुख्यालयात निर्जंतुकीकरण करण्यात करण्यात येणार आहे. 

शहरात वाढत जाणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत असल्याने महापालकेतील इतर विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही कोरोनाचे काम देण्यात आले आहे.

मोठी बातमी - कोरोनाच्या पाश्वभूमीवर कंटेनमेंट क्षेत्रातील नागरिक धास्तावलेत, उचलतायत 'हे' मोठं पाऊल  

कोरोनाबाधितांना रुग्णालयात आणि विलगीकरण केंद्रात नेण्यापासून ते औषधोपचार आणि जेवणापर्यंतची व्यवस्था महापालिकेच्या अधिकाऱ्यांना करावी लागत आहे. या दरम्यान कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यामुळे आरोग्य विभागाचे सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांना लागण झाली होती. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे आरोग्य विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागण झाली. त्यानंतर घनकचरा विभागातील उपायुक्तांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. सद्या त्यांची प्रकृती सुधारत असताना मुख्यालयातील इतर दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

हे कर्मचारी विविध कामांच्या फाईल घेऊन विभागात फिरले असल्यामुळे महापालिका मुख्यालयात कामावर येणारे सर्वच अधिकारी आणि कर्मचारी चिंतेत पडले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या आपणही संपर्कात आलो तर नाही ना याची चौकशी आप-आपसांत सुरू झाली आहे. मुख्यालयात सध्या एकमेकांकडे संशयाचे पाहिले जात असल्याने गंभीर वातावरण निर्माण झाले आहे.

मोठी बातमी - उद्यापासून ठाण्यात कडकडीत लॉकडाऊन, म्हणून आज ठाणेकरांनी 'काय' केलंय वाचा..

या पार्श्वभूमीवर इतर कर्मचाऱ्यांना कोरोना होऊ नये म्हणून संपूर्ण महापालिका मुख्यालय निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. दोन दिवस नवी मुंबई महापालिका मुख्यालयात निर्जंतुकीकरण काम करण्यात येईल. 

navi mumbai municipal corporation building closed for two days because 6 workers tested positive 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navi mumbai municipal corporation building closed for two days because 6 workers tested positive