

NMMC
ESakal
विक्रम गायकवाड
नवी मुंबई : नवी मुंबई पालिकेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सहाय्यक आयुक्त पदाच्या भरती प्रक्रियेत प्रचंड सावळा गोंधळ समोर आला आहे. सुरुवातीला केवळ १०० प्रश्न आणि २०० गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची सरळसेवा परीक्षा घेण्याचे जाहीर करणाऱ्या पालिकेने, आता एमपीएससीच्या धर्तीवर तीन टप्प्यांचा क्लिष्ट पॅटर्न लागू केल्याने उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बेरोजगारांकडून कोट्यवधींचे परीक्षा शुल्क गोळा केल्यानंतर पालिकेला मुचलेल्या या ज्ञानामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.