Navi Mumbai: परीक्षेच्या 24 तास आधी भरती रद्द! १८ हजार ९३० उमेदवारांमध्ये संभ्रम, नवी मुंबई महापालिकेत स्थगन प्रस्ताव

NMMC Direct Recruitment: नवी मुंबई महापालिकेच्या सरळ सेवा भरती परीक्षेच्या 24 तास आधी रद्द करण्यात आली. या प्रकारामुळे १८ हजार ९३० उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
navi mumbai municipal corporation

navi mumbai municipal corporation

ESakal

Updated on

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेवर ऐनवेळी राजकीय वादाचे सावट आले आहे. गट अ, गट ब आणि गट क असा तीन गटांमधील एकूण १३२ पदांसाठी मंगळवार (ता. २१) आणि बुधवारी (ता. २२) होणाऱ्या ऑनलाइन स्पर्धा परीक्षेच्या अवघ्या २४ तास आधी ती स्थगित करण्याचा प्रस्ताव सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com