

Navi Mumbai Municipal Corporation Election Results
ESakal
NMMC Election Result 2026: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये नवी मुंबईत भाजप आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. तर एकनाथ शिंदेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसने अद्याप आपले खाते उघडलेले नाही. हे सुरुवातीचे ट्रेंड असले तरी, सर्व जागांचे निकाल येण्यापूर्वी मोठे बदल होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई मतदारसंघात आतापर्यंत कोणता पक्ष आघाडीवर आहे आणि कोणता उमेदवार जिंकला याची यादी समोर आली आहे.