नवी मुंबई महानगर पालिकेचा अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी 'एक नंबर' उपक्रम...

नवी मुंबई महानगर पालिकेचा अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी 'एक नंबर' उपक्रम...

नवी मुंबई: भारतात कोरोनाग्रस्तांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. देशात ५६० peks पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सोमवारी सर्व वाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला होता. आता केंद्र सरकारनंही संपूर्ण देश पुढच्या २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या सगळ्यात नवी मुंबई परिवहन मंडळानं एक विशेष सुविधा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरु केली आहे.

देशभरातले डॉक्टर, परिचारक, रुग्णवाहिकेचे चालक, पोलिस आपला देश आणि देशातले लोकं सुरक्षित राहावे म्हणून झटत आहेत. मात्र  सरकारनं लोकल किंवा बस सेवा बंद केल्यामुळे या आरोग्य सेवा पुरवणाऱ्या किंवा पोलिसांसमोर ये जा करण्याचा यक्ष प्रश्न निर्माण झाला होता. आता नवी मुंबई परिवहन मंडळानं या कर्मचाऱ्यांसाठी ३१ मार्चपर्यंत बस सुविधा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. NMMT चा हा उपक्रम स्तुत्य  असाच आहे.

नवी मुंबई परिवहन मंडळ हे सुविधा ३१ मार्च रात्री १२ वाजेपर्यंत पुरवणार आहे. मात्र सामान्य लोकं या सुविधेचा वापर करू शकणार नाहीये. आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांचं ओळखपत्र बघूनच त्यांना बसमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. जर कोणाकडे ओळखपत्र नसेल तर त्यांना प्रवेश दिला जाणार नाहीये.

महानगरपालिकेचे कर्मचारी,पोलिस, आरोग्य सेवा पुरवणारे कर्मचारी, महावितरणाचे कर्मचारी त्यांना नवी मुंबई वरिवहन मंडळ बस सेवा पुरवणार आहे. तसंच खासगी कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या खासगी वाहनांची सुविधा पुरवू शकतात नंतर यासाठी त्यांना परवानगी घेणं आवश्यक असणार आहे. त्यामुळे NMMT च्या या विशेष सुविधेचं आता कौतुक होतंय.  

navi mumbai municipal corporation to run special buses for people working in emergency services 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com