

Navi Mumbai municipal corporation
ESakal
तुर्भे : नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील रस्ते आणि गटारांवरील निष्काळजी कामामुळे जखमी झालेल्या किंवा जीव गमावलेल्या नागरिकांना आता नुकसानभरपाई मिळणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गठित समितीमार्फत अशा अपघातग्रस्तांना किंवा त्यांच्या वारसांना योग्य मोबदला देण्याची प्रक्रिया नवी मुंबई महापालिकेने सुरू केली आहे. यासाठी पुराव्यासह नियमानुसार अर्ज करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.