नवी मुंबईतील राजकिय नेत्यांना मोठा दिलासा! पाहा नेमकं काय झालं...

नवी मुंबईतील राजकिय नेत्यांना मोठा दिलासा! पाहा नेमकं काय झालं...
नवी मुंबईतील राजकिय नेत्यांना मोठा दिलासा! पाहा नेमकं काय झालं...

नवी मुंबई : महापालिकेची मार्च-एप्रिल २०२०ची निवडणूक पॅनेल पद्धतीने नकरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. रविवारी (ता.१५) नागपूरला पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. सरकारने पॅनेल पद्धत रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मंगळवारी (ता.१७) महापालिकेच्या निवडणूक विभागातर्फे आयोजित केलेली आरक्षणनिहाय प्रभाग रचना सोडतीचा कार्यक्रम प्रशासनाला गुंडाळावा लागला आहे. 

एप्रिल २०२० ला महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे; परंतु ही निवडणूक पॅनेल पद्धतीने होणार असल्यामुळे नवी मुंबईत सर्वच राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींच्या पोटात गोळा आला होता. पॅनेल पद्धतीने प्रभाग रचना बदलली जाणार असून, आपल्या शेजारच्या उमेदवारांचा भार सोसावा लागणार होता. प्रभागाच्या हद्दी वाढल्यामुळे प्रचार खर्च, राजकीय जोखीम अशा अनेक अडचणींचा राजकीय नेत्यांना सामना करावा लागणार होता. पॅनेल पद्धतींमध्ये असणाऱ्या जोखमीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे विरोध दर्शवला होता. या पक्षाच्या नेत्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत निवेदनही दिले होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष शेट्टी, माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी पॅनेल पद्धतींनुसार होणारी निवडणूक रद्द होण्यासाठी दंड थोपटले होते. अखेर रविवारी नागपूर येथे अधिवेशनाआधी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पॅनेल पद्धत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगानेही महापालिकेला मंगळवारी होणारी आरक्षण सोडत पुढे ढकलण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनांमुळे पालिकेतर्फे वाशीतील भावे नाट्यगृहात होणारा सोडतीचा कार्यक्रम गुंडाळावा लागला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या नवी मुंबईतील घटक पक्षांच्या नेत्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकार लवकरच याबाबत परिपत्रक काढणार आहे.

ही बातमी वाचा! - लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू 

कसे जुळले समीकरण 
पॅनेल पद्धतीमुळे होणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये सर्वाधिक फटका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांना बसण्याची शक्‍यता होती. त्यामुळे पॅनेल पद्धत रद्द करण्यासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, प्रदेश सचिव संतोष शेट्टी यांनी गांधी भवनला कोकण विभागाची बैठक बोलवून घेतली. या बैठकीत कोंकण विभागीय निरीक्षक बी. एम. संदीप, प्रदेश उपाध्यक्ष मुजाफर हुसेन, राजन भोसले आदी नेत्यांसमोर कौशिक व शेट्टी यांनी पॅनेलला विरोध करण्याची भूमिका मांडली. या बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना भेटून निवेदन देण्यात आले. तसेच माजी आमदार व राष्ट्रवादीचे प्रभारी शशिकांत शिंदे यांनी सकाळी काँग्रेसच्या नेते मंडळींना सोबत घेऊन ‘सिल्व्हर ओक’ या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शदर पवार यांच्या निवासस्थानी जाऊन पॅनेल पद्धतीला धोका समजावून सांगितला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com