Navi Mumbai: मुक्या जीवांना हक्काच्या उपचारांची सुविधा मिळणार, नवी मुंबईत पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू होणार; वाचा सविस्तर

Veterinary Hospital: नवी मुंबईत पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू होणार आहे. यामुळे मुक्या जीवांना हक्काच्या उपचारांची सुविधा मिळणार आहे. तर येथे भटक्यांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.
Veterinary Hospital

Veterinary Hospital

ESakal

Updated on: 

तुर्भे : नवी मुंबई महापालिकेच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. जुईनगर येथे उभारण्यात आलेल्या या रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे भटके, तसेच पाळीव प्राणी-पक्ष्यांवर उपचाराची सुविधा आता उपलब्ध झाली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा विषय मार्गी लागल्याने प्राणीप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com