
खारघर, ता. १४ (बातमीदार) : शहरातील इस्कॉन मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून खारघरमधील श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचा उद्घाटन सोहळा ९ ते १५ जानेवारीदरम्यान होणार आहे. या मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
इस्कॉन मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून उद्घाटन सोहळापूर्व कार्यक्रमात कलश स्थापना, कीर्तन-प्रवचन, भजनसंध्या, अभिषेक होणार आहे. त्यात ११ जानेवारीला अनुप जलोटा यांचे भजन, १२ जानेवारीला शुभधा वराडकर यांचे नृत्य, गीता राबरी यांचे विशेष गायन आणि लोकनाथ स्वामींचे प्रवचन होणार आहे.