जनसायकल प्रणालीचा वापर करण्यात नवी मुंबई आघाडीवर

नवी मुंबई तब्‍बल ३५ लाख किमी फेऱ्या
Yulu cycle
Yulu cyclesakal media

वाशी : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात (Navi Mumbai municipal corporation) युलू सायकल (yulu cycle project) प्रकल्पाला १ नोव्हेंबर २०१८ पासून सुरुवात झाली असून ६०० सायकल आणि १०८ इ-बाईक्स प्रवासी सेवेत कार्यान्वित आहे. आतापर्यत या जनसायकल प्रणालीच्या माध्यमातून नवी मुंबईकरांनी (Navi mumbai) ३५ लाख कि.मी. फेऱ्या (राईड्स) केल्या आहेत. जनसायकल प्रणालीचा सर्वाधिक वापर करणारे नवी मुंबई हे भारतात अव्वल ठरले आहे.

प्रदूषण नियंत्रण व शहरातील नागरिकांच्या तंदुरुस्तीसाठी पालिकेने १ नोव्हेंबर २०१८ पासून राबवलेल्या युलू सायकल प्रकल्पाला नवी मुंबईकरांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून ई-बाईकलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे नवी मुंबईत आता पामबीच मार्गावर ७.५ किलोमीटरचा सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात येणार आहे. यामधून ३८ कोटी ६१ लाख ७ हजार ७३२ ग्रॅम कार्बन क्रेडिट प्राप्त होणार असल्याचा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे.
सुरुवातीला युलू सायकल प्रणाली ही बेलापूर, वाशी या परिमंडळ १ क्षेत्रातच २२ ठिकाणी सुरू होती. त्यानंतर ऐरोलीचे तत्कालीन आमदार संदीप नाईक यांच्या पाठपुराव्यानंतर युलू सायकल सहभाग प्रणालीचा प्रारंभ कोपरखैरणे निसर्ग उद्यान तसेच ऐरोली सेक्टर १५ येथील जॉगिंग ट्रॅक येथे करण्यात आला.

Yulu cycle
रायगड जिल्ह्यात ११.५५ टक्क्याने वनक्षेत्रात वाढ; वृक्षलागवडीसाठी भरीव कामगिरी

राज्‍यात सर्वात आधी नवी मुंबईत ई-बाईक सहभाग प्रणाली सुरू करण्यात आली. तरुणाईकडून दुचाकीचा वापर अधिक करण्यात येत असून त्यामुळे प्रदूषणालाही आळा बसेल. शहरात आतापर्यंत सायकल प्रणालीतून ३५ लाख कि.मी. राईड्स करण्यात आल्या आहेत. त्‍यामुळे इंधनावरील दुचाकी व त्यामुळे होणारे प्रदूषण कमी झाले असून देशात सर्वाधिक सायकल प्रणालीचा वापर करणारे नवी मुंबई हे पहिले शहर ठरले आहे.

नवी मुंबई हे जनसायकलचा वापर करणारे व प्रतिसाद देणारे देशातील पहिले शहर आहे. नागरिकांच्या प्रतिसादामुळे पर्यावरणपूरक कामासाठी प्रोत्साहन मिळते. लवकरच पामबीच मार्गावर ७.५ किमी सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात येणार आहे. सायकलचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्या व सजगता दाखवणाऱ्या पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांचे कौतुक आहे.
- अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com