रायगड जिल्ह्यात ११.५५ टक्क्याने वनक्षेत्रात वाढ; वृक्षलागवडीसाठी भरीव कामगिरी

Forest
Forestsakal media

अलिबाग : भारतीय वन सर्वेक्षण (FSI) विभागाने तयार केलेल्या २०२१ अहवालानुसार रायगड (Raigad) जिल्ह्यातील वनक्षेत्रात दोन वर्षांत तब्बल ११. ५५ टक्के वाढ झाली आहे. जिल्ह्यात वृक्षलागवडीसाठी (tree plantation) भरीव कामगिरी झालेली आहे. सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग या शासकीय यंत्रणेबरोबरच डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या (Dr. Shri Nanasaheb Dharmadhikari Pratishthan) माध्यमातूनही यासाठी मेहनत घेतल्याचे हे फळ असल्याचे समजण्यात येते.

Forest
मुस्लिम समाज सभागृहासाठी मोठा निधी प्राप्त करून देणार - अनिकेत तटकरे

रायगड जिल्ह्यातील वनक्षेत्रात २०१० नंतर सातत्याने वाढ होत आहे. २०११ मध्ये १६८३.३४ चौरस किलोमीटर वनक्षेत्र होते. २०२१ मध्ये ते २९५१.०१ चौरस किलोमीटर इतके झाली असून दहा वर्षांतील एकूण वाढ १२६७.६७ चौरस किलोमीटर इतकी आहे. मात्र, यात घनदाट जंगलांचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असल्याचीही नोंद भारतीय वन सर्वेक्षण (एफएसआय) विभागाने केली. जिल्ह्याचे कांदळवनाचे क्षेत्रही साधारण २.२५ चौरस किलोमीटरने वाढले.

रायगड वनक्षेत्रात कर्नाळा, फणसाड अभयारण्याच्या भोवताली पूर्वी घनदाट जंगल होते. त्याचे प्रमाण घटत चालले आहे. याचबरोबर श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यातील घनदाट जंगल कमी होत असल्याने घनदाट जंगलाच्या आश्रयाला असणाऱ्या हिंस्र प्राण्यांचीही संख्या कमी झाल्याचे अलिकडेच करण्यात वन्यप्राणी गणनेत दिसून येते. जिल्ह्यात मुख्यतः शिसव, करंज, आवळा, साग, चिंच, खैर, रायवळ आंबे अशी झाडे आढळून येतात. पर्यावरण रक्षणासाठी ही झाडे उपयोगी आहेत. सामाजिक वनीकरण विभागातर्फे गेल्या दोन वर्षांत अनेक वृक्ष लावली आहेत.

Forest
नवी मुंबई : सिडकोच्या भूखंडांवर क्रिकेटचा बेकायदा डाव

शतकोटी वृक्षलागवड मोहिमेतूनही रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली. यामुळे नव्यानेच लावलेल्या झाडामुळे मध्यम, तुरळक, खुरट्या वनक्षेत्रात वाढ होत आहे. वनसर्वेक्षण विभागाने उपग्रहाद्वारे जिल्ह्याचे वनक्षेत्रातील वाढ मोजली असता जिल्ह्यात वनक्षेत्रात मागील दोन वर्षांच्या तुलनेत ११.५५ टक्के वाढ झाल्याचे आढळून आले.

दरवर्षी केल्या जाणाऱ्या वृक्षलागवडीमुळे वनक्षेत्र वाढले आहे. कांदळवनामध्येही वाढ होत असल्याचे उपग्रहाद्वारे केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. किनारपट्टीवरील जैवविविधता सुरक्षित राहणार आहे. घनदाट जंगलामुळे पूर्वीप्रमाणे हिंस्र प्राणी कमी झालेले आहेत.
- आशीष ठाकरे, वनक्षेत्रपाल, अलिबाग

वनक्षेत्राची स्थिती
२०११ (चौ. किमी)
घनदाट - १९९.०४
मध्यम - ३४१.५३
तुरळक - ११४२.७७
एकूण - १६८३.३४

२०२१ (चौ. किमी)
घनदाट - १३.००
मध्यम - १२५४.२१
तुरळक - १६८३.८०
एकूण - २९५१.०१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com