

Navi Mumbai Taloja Accident
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबई तळोजा येथे 'हिट अँड रन' सारखा प्रकार घडला आहे. तळोजा सेक्टर १० येथे एका भरधाव गाडीने ८ ते १० जणांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत काहींचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली असून या अपघातानंतर आरोपी कारचालक फरार झाल्याची माहिती आहे.