Navi Mumbai Leopard Video Fake
esakal
नवी मुंबईतल्या खारघर–तळोजा जेल परिसरातील कुटुंबन गावाजवळ बिबट्या असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता तो व्हिडीओ खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे. वनविभागाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.