
Navi Mumbai: नवी मुंबई महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणजे मालमत्ता कर. ही करवसुली करण्यासाठी पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने कंबर कसली आहे.
यंदाही पालिकेने आर्थिक वर्ष २०२४-२५च्या डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत वसुली ध्येयपूर्तीकडे वाटचाल सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. पालिकेने डिसेंबरअखेरपर्यंत ५६९ कोटी ४५ लाख ७७ हजार २०४ रुपयांची वसुली केली आहे. पालिकेने एक हजार कोटी करवसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे.