

Navi Mumbai To Sindhudurg Chipi Flight
ESakal
मुंबई : आतापर्यंत कोकणकरांना तळकोकणात जाण्यासाठी रस्ते किंवा रेल्वेने अनेक तासांचा प्रवास करावा लागत होता. मात्र आता नवी मुंबई ते सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळादरम्यान नियमित विमानसेवा सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबई ते कोकणचा प्रवास अवघ्या तासाभरात पूर्ण होणार आहे. या विमानसेवेमुळे कोकणवासीय तसेच कामानिमित्त मुंबईत राहणारे चाकरमानी आणि पर्यटकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.