नवी मुंबईच्या विकासाला वेग! खारघर-तुर्भे लिंक रोडच्या जुळ्या बोगद्यांचे खोदकाम पूर्ण; ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत पूर्ण होणार

Navi Mumbai Twin Tunnel Project: नवी मुंबईतील खारघर-तुर्भे लिंक रोडच्या जुळ्या बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर नवी मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळणार आहे.
Kharghar-Turbhe Link Road Twin tunnels Project

Kharghar-Turbhe Link Road Twin tunnels Project

ESakal

Updated on: 

नवी मुंबई : नवी मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी आणि पूर्व-पश्चिम परिसराला थेट जोडण्यासाठी सिडकोमार्फत हाती घेण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी 'खारघर-तुर्भे लिंक रोड' प्रकल्पाने एक ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. या प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक अशा पारसिक डोंगरातून जाणाऱ्या दोन्ही समांतर भुयारी बोगद्यांचे खोदकाम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. यामुळे हा महत्त्वपूर्ण मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...