ते आले, त्यांनी पाहिलं, अन्‌ ते प्रेमात पडले!
ते आले, त्यांनी पाहिलं, अन्‌ ते प्रेमात पडले!

ते आले, त्यांनी पाहिलं, अन्‌ ते प्रेमात पडले!

नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशनचे संचालक व्ही. के. जिंदाल यांनी पालिका क्षेत्राला भेट देत, शहरातील स्वच्छताविषयक कामांची पाहणी केली. पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी त्यांचे स्वागत केले. स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली.  

व्ही. के. जिंदाल यांनी स्वच्छताविषयक लोकसहभाग वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या शहरातील विविध जनजागृतीपर उपक्रमांची पाहणी केली. वाशीतील छत्रपती शिवाजी चौकात ‘स्वच्छता मित्र’ या अभिनव संकल्पनेला भेट देत, त्यांनी प्रकाशमान बॉलवर हात ठेवत स्वच्छतेची शपथ घेतली. या उपक्रमाच्या वेगळेपणाचे त्यांनी कौतुक केले. त्याचप्रमाणे स्वच्छताविषयक जनजागृती करणाऱ्या एलईडी स्क्रीन लावलेल्या मोबाईल व्हॅनची त्यांनी पाहणी केली. तसेच त्यावरील कचरासुराला चेंडू मारून स्वच्छतेचा संदेश मोठ्यांसह प्रामुख्याने मुलांमध्ये प्रसारित करणाऱ्या कचरासुर या वैविध्यपूर्ण उपक्रमाची प्रशंसा केली. वाशी येथील मिनी सी-शोअर परिसराला भेट दिल्यानंतर तेथील निसर्गरम्य वातावरणाने प्रभावित होऊन व्ही. के. जिंदाल यांनी या परिसरात आणखी सुविधा वाढविण्याविषयी मौलिक सूचना केल्या. जुनी क्षेपणभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करून त्या ठिकाणी फुलविण्यात आलेल्या कोपरखैरणे येथील निसर्गोद्यानाला भेट दिली.

संकल्पनांबाबत नागरिकांची प्रशंसा
पालिका शाळांमध्ये प्लास्टिमॅन ही अभिनव संकल्पना राबविणाऱ्या अंकुर संस्थेच्या गीता देशपांडे आणि सहकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी इतक्‍या बारकाईने प्लास्टिक निर्मूलनाचा नवी मुंबईचे नागरिक विचार करीत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्याचप्रमाणे प्रा. वृषाली मगदूम संचलित स्त्री मुक्ती संघटनेच्या घरातच ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा खतटोपलीची (कंपोस्ट बास्केट) पाहणी करून कचरा निर्मूलनाचे उत्तम साहित्य अशी प्रशंसा केली.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com