youth died by heart attack in local train
ESakal
मुंबई
Navi Mumbai: रुग्णवाहिका होती, पण चालक जेवायला गेला; वाशी स्थानकात तरुणाचा दुर्दैवी अंत, काय घडलं?
Local Train News: लोकलमध्ये प्रवासादरम्यान २५ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. मात्र यामध्ये तरूणाच्या कुटुंबीयांनी तरुणाला वेळीच उपचार मिळाले नाही, असा आरोप केला आहे.
नवी मुंबई : नुकतेच पनवेल–खंडेश्वर दरम्यान एका माथेफिरू तरुणाने धावत्या लोकलमधून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला ढकलून देण्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेत तरुणी गंभीर जखमी अवस्थेत असून पोलिसांनी आरोपीला तीन दिवसांची अटक केली आहे. लोकलबाबतचे हे प्रकरण ज्वलंत असताना नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकात धक्कादायक प्रकार घडला आहे.

