Kishori Pednekar
Kishori Pednekar

'मला तो व्हिडिओ द्या', राणांना डिस्चार्ज मिळताच किशोरी पेडणेकर लिलावतीत

नवनीत राणांचा रुग्णालयातला फोटो व्हायरल झाल्यावर शिवसेनेने रुग्णालयाला जाब विचारला आहे.
Published on

खासदार नवनीत राणा गेल्या काही दिवसांपासून लिलावती रुग्णालयात उपचार घेत होत्या. यावेळी त्यांचे रुग्णालयातले काही फोटो व्हायरल होत होते. त्यांचा MRI मशीनमधला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोवर आक्षेप घेत आता शिवसेना आक्रमक झाली आहे. यावरून किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे यांनी लिलावती रुग्णालयाला धारेवर धरलं आहे.

नवनीत राणांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे या लीलावती रुग्णालयात पोहोचल्या आहेत. नवनीत राणांचा रुग्णालयातला फोटो व्हायरल (Navneet Rana Photo Viral) झाल्यानंतर शिवसेनेने रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला आहे. नवनीत राणा स्पाँडिलायसिसचे उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांचा MRI काढण्यात आला. यावेळी MRI काढत असतानाचे त्यांचे काही फोटो प्रसिद्ध झाले होते. यावरूनच पेडणेकर यांनी आक्षेप घेतला आहे. नवनीत राणांचा MRI नक्की झाला की नाही? झाला असेल तर रुग्णालय प्रशासनाने त्याला अहवाल सादर करावा. MRI रुममध्ये रुग्णासोबत एकाच व्यक्तीला परवानगी असताना राणांसोबत चार लोक कसे गेले. सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ मला द्या, अशी मागणीही पेडणेकर यांनी केली आहे.

Kishori Pednekar
रुग्णालयात नवनीत राणांच्या भेटीला रवी राणा! तब्बल १२ दिवसानंतर भेट

राणांना रुग्णालयात शूटिंगची परवानगी कशी देण्यात आली, असा सवालही शिवसेनेने रुग्णालय प्रशासनाला केला आहे. त्याचबरोबर स्पाँडिलायसिस असताना नवनीत राणांनी उशी कशी काय वापरली, असा प्रश्नही पेडणेकरांनी उपस्थित केला आहे. रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे तसंच दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन शिवसेनेला दिलं आहे.

लिलावती रुग्णालयाविरोधात आपण तक्रार देणार असल्याचं शिवसेनेने सांगितलं. यावेळी बोलताना शिवसेना नेत्या मनिषा कायंदे म्हणाल्या, नवनीत राणांनी सेन्सेटिव्ह एरिया मध्ये फोटोग्राफी केली गेली. हॉस्पिटलचे नियम तोडले गेले.हॉस्पिटलच्या काळजीपोटी आम्ही येथे आलो. या हॉस्पिटलमध्ये अनेक VIP येत असतात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असतो. त्यामुळे या प्रकरणाची रितसर तक्रार आम्ही पोलीस स्टेशनमध्ये करणार आहोत. आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही. पण स्टाफला कोणी धमकावत फोटोग्राफी केली का, नर्स स्टाफवर दबाव आणला का, याची माहिती आम्हाला हवी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com