Mumbai : नौदल अग्निविर आत्महत्या प्रकरण,नौदलाने दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

नौदल प्रमुख एडमीरल आर हरी कुमार यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगीतले
Mumbai
Mumbaiesakal

मुंबई : मुंबईत एका महिला अग्निवीर आत्महत्येची नौदलांने गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा भारतीय नौदलाकडून करण्यात आली आहे. नौदल प्रमुख एडमीरल आर हरी कुमार यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगीतले.

Mumbai
Winter Tips : हिवाळ्यात 'अशी' घ्या नवजात बाळाची काळजी; दुर्लक्ष केल्यास होऊ शकतात गंभीर परिणाम

मुळची केरळची राहीवासी असलेल्या अपर्ना नायर (वय २० वर्षे)ही आयएनएस हमला या नौदलाच्या युध्दनौकेवर अग्निविर म्हणून प्रशिक्षण घेत होती. ही अत्यंत दुर्दवी घटना आहे. आम्ही त्याची दखल घेतली आहे.या प्रकरणाच्या चौकशीसाठी बोर्ड ऑफ इंक्वायरीचे आदेश पारीत करणयात आल्याचे. एडमीरल कुमार यांनी सांगीतले.

वैयक्तीक कारणामुळे तरुणीने आत्महत्या केल्याचे संकेत प्राथमिक पोलिस तपासात मिळत आहेत. मात्र नौदल जवानांचा कामादरम्यानचा तणाव कमी करण्यासाठी नौदल काही उपाययोजना करत आहे. यामध्ये काही यूनीटवर मानसोपचारतज्ञ नियुक्त केले जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com