आठवड्याभरात भाजपाला पडणार भगदाड, भाजप नेते शिवसेनेत येण्यास उत्सुक - नवाब मलिक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 February 2020

महाराष्ट्र भारतीय जनता पक्षात मोठे बदल होणार आहेत अश्या चर्चा आहेत. देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाऊ शकतात, तर इथे राज्यात चंद्रकांत पाटलांच्या गळ्यात विरोधीपक्षनेतेपद आणि पंकजा मुंडे यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्षपद जाऊ शकतं अशा चर्चा आहेत. मात्र याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे नेते आणि सध्याचे महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मोठा खुलासा केलाय. 

महाराष्ट्र भारतीय जनता पक्षात मोठे बदल होणार आहेत अश्या चर्चा आहेत. देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाऊ शकतात, तर इथे राज्यात चंद्रकांत पाटलांच्या गळ्यात विरोधीपक्षनेतेपद आणि पंकजा मुंडे यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्षपद जाऊ शकतं अशा चर्चा आहेत. मात्र याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे नेते आणि सध्याचे महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मोठा खुलासा केलाय. 

मोठी बातमी - पंकजा मुंडे यांच्यावर भाजप सोपवणार 'ही' मोठी जबाबदारी, मोठं प्रमोशन?

भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते आता शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलंय. निवडुकांपूर्वी मोठ्या प्रमाणात भाजपात इनकमिंग झालं. अशात आधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील बडे नेते भाजपात गेलेत. यापैकी काही नेते आता शिवसेनेत जाण्यास उत्सुक आहेत. अशात भाजप मोठा करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली मात्र ज्यांच्यावर अन्याय झाला असे काही नेते आता शिवसेनेची वाट धरणार असल्याचं नवाब मलिक यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलंय. नवाब मलिक यांचा रोख एकनाथ खडसे यांच्याकडे असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.   

मोठी बातमी - फडणवीसांच्या गळ्यात देशाच्या अर्थमंत्रीपदाची माळ ? पुढचा अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता..

त्यामुळे येत्या एका आठवड्याभरात भाजपचे काही नेते आणि माजी मंत्री महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये सामील होण्यासाठी ते उत्सुक आहेत,  असा मोठा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. 

भाजपाची लाट आता ओसरली आहे. त्यामुळे भाजपने आता सावध होण्याची गरज आहे असं देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलंय. 

मोठी बातमी - ज्याने कुणी गंठण चोरले असेल, तो उद्याच्या उद्या मरेल..

महाराष्ट्रात पुन्हा 'ऑपरेशन कमल' राबवलं जाणार असल्याचं देखील बोललं जातंय. यातच डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात मध्यावधी लागू शकतील असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. खुद्द फडणवीस देखील महाराष्ट्रात सत्तापालट होईल असं म्हणत आहेत. मात्र नवाब मलिक यांनी या सर्व केवळ पेरलेल्या बातम्या आहेत असं म्हणालेत. दिल्लीत महाराष्ट्रातील भाजप नेते प्रचारासाठी तळ ठोकून आहेत. अशात महाराष्ट्रातच यांची बोट बुडणार, असं वक्तव्य नवाब मलिक यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना  केलंय. 

nawab malik indirectly says that bjp leaders will join shivsena in coming week


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nawab malik indirectly says that bjp leaders will join shivsena in coming week