esakal | भरसमुद्रातील ड्रग्स पार्टीवर एनसीबीचा छापा ; सुपरस्टारच्या मुलाचा समावेश? Mumbai NCB
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

भरसमुद्रातील ड्रग्स पार्टीवर एनसीबीचा छापा ; सुपरस्टारच्या मुलाचा समावेश?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई (Mumbai) समुद्रकिनाजवळ क्रूजवर (Cruz) सुरु असलेल्या पार्टीवर एनसीबीने (NCB) छापा टाकला असून, मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा (Drugs) साठा जप्त केल्याचे एनसीबी सुत्रांकडून सांगण्यात आलंय. हे जहाज मुंबईवरुन (Mumbai) गोव्याकडे (Goa) निघालं होत,भर समुद्रात एनसीबीने छापा टाकला. या जहाजामध्ये दबा धरुन बसलेल्या एनसीबीचे झोनल अधिकारी समिर वानखेडे यांच्या नेतृत्वात ही धाड टाकण्यात आली. या प्रकरणात 10 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यामध्ये बॉलीवूडच्या एका सुपरस्टारच्या मुलाचा समावेश असल्याचे एनसीबीच्या सुत्रांनी सांगीतले.

मुंबई बंदरातून हे क्रूज जहाज गोव्याच्या दिशेने निघाले होते. मुंबई बंदर सोडून दोन तास झाल्यावर या जहाजावर पार्टी सुरु झाली. ही ड्रग पार्टी सुरु होताच, जहाजावर दबा धरुन बसलेल्या एनसीबीने पार्टी उधळली. या छाप्यात कोकेन, हशीश. मेफेड्रोन आणि एमडीएमए सारखे ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.

हेही वाचा: Satara : पावणेदोन लाखांचा गुटखा जप्त; एक ताब्यात

या सर्व प्रकरणात उशीरापर्यंत कारवाई सुरु असून, यातून एक मोठ ड्रग रॅकेट समोर येण्याची शक्यता असल्याचं एनसीबी सुत्रांनी सांगीतलं आहे. ताब्यात घेतलेल्या सर्वांना मुंबईत आणल जाणार आहे.

loading image
go to top