NCP : राष्ट्रवादी राज्यातही ‘भाकरी’ फिरवणार; पक्षसंघटनेत व विधिमंडळात आणणार ‘मराठा-ओबीसी’ सूत्र

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यभरात संघटन मजबूत करण्याची रणनीती
NCP change in national executive Maratha-OBC formula lok sabha election politics
NCP change in national executive Maratha-OBC formula lok sabha election politicsesakal
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय कार्यकारिणीत बदल केल्यानंतर आता राज्यातही ‘भाकरी’ फिरविण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदातून मुक्त होत पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर पक्षांतर्गत घडामोडींना वेग येत असल्याचे संकेत आहेत.

पक्षात सामाजिक समीकरण साधताना प्रमुख पदावर ‘मराठा-ओबीसी’ असे सूत्र साधण्याचा प्रयत्न पक्षातर्फे केला जाणार आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्षपदावर अजित पवार यांना संधी मिळण्याचे दाट संकेत असून, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यभरात संघटन मजबूत करण्याची रणनीती असेल.

अजित पवार यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाले तर विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ओबीसी समाजातील नेत्याकडे दिले जाईल, हे स्पष्ट आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी ओबीसी नेत्यांमधून धनंजय मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक असली, तरी नवा आणि आक्रमक चेहरा म्हणून जितेंद्र आव्हाड यांचेही नाव चर्चेत आहे. यावर आता पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

NCP change in national executive Maratha-OBC formula lok sabha election politics
NCP: नुसते बोलून चालणार नाही, आता हवा ओबीसी प्रदेशाध्यक्ष ! ज्येष्ठ नेत्याचा राष्ट्रवादीला घरचा आहेर

राज्यात महाविकास आघाडीची वज्रमूठ अबाधित असताना राष्ट्रवादीने राज्यात नंबर एकचा पक्ष होण्याचा निर्धार केला आहे. यासाठी अजित पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा द्यावी, असे कार्यकर्त्यांसह अनेक आमदारांचे मत आहे. त्यातच आजपर्यंत पक्षसंघटनेत कोणतेही पद अजित पवार यांनी भूषविलेले नाही. त्यामुळे जर त्यांना पक्षसंघटनेत पद द्यायचेच ठरले तर ते प्रदेशाध्यक्ष हेच असेल, असे मानले जाते. दरम्यान, १८ जुलैपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच हे बदल होतील, अशी चिन्हे आहेत.

NCP change in national executive Maratha-OBC formula lok sabha election politics
NCP News : "जयंत पाटील भाजपमध्ये जाणार?" NCP चा सर्व्हे काय सांगतो? राष्ट्रवादीच्या नेत्याचा खुलासा

प्रदेशाध्यक्षपदासाठी भुजबळही इच्छुक

पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेत आपणही ओबीसी नेता म्हणून प्रदेशाध्यक्ष अथवा विरोधी पक्षनेतेपदाच्या स्पर्धेत असल्याचे सूतोवाच केले. ते म्हणाले, की काँग्रेसमध्ये पूर्वीपासून ‘मराठा-ओबीसी’ असे समीकरण राबविले जाते. भाजपनेदेखील ओबीसी समाजातील चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्षपद दिले. त्यामुळे जर प्रदेशाध्यक्ष मराठा असेल, तर विरोधी पक्षनेता ओबीसी असायला हवा. याच धर्तीवर अजित पवार प्रदेशाध्यक्ष झाले तर विरोधी पक्षनेतेपदावर ओबीसी समाजातील जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांच्यासह माझाही विचार व्हावा, असे स्पष्ट मत भुजबळ यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sunil Tatkare Reacts to Political Strategy Buzz
Prashant Kishor Holds Strategy Talks With Sunetra Pawar Amid NCP Leadership Change Speculation in Maharashtra Politics
Congress Faces NCP Protest in Pune After Alleged Offensive Statement on Deputy Chief Minister Sunetra Pawar
NCP workers staged a protest in Baramati against former Chief Minister Prithviraj Chavan's remarks on Deputy Chief Minister Sunetra Pawar, calling the comments inappropriate and disrespectful to women leaders.
Marathi News Esakal
www.esakal.com