शरद पवार दौरा संपवून मुंबईकडे; काय होणार?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 November 2019

शरद पवार हे मुंबईहून दिल्लीला जाणार आहेत. 4 नोव्हेंबरला शरद पवार काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. या भेटीत महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

नाशिक : पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी नाशिक दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांचा दौरा संपवून तातडीने मुंबईकडे रवाना झाले असून, यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 

#PowerDrama सरकार स्थापनेस दिरंगाईमुळे महाराष्ट्र संतापला

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार हे मुंबईहून दिल्लीला जाणार आहेत. 4 नोव्हेंबरला शरद पवार काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. या भेटीत महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजप-शिवसेना यांच्यात अद्याप सत्तेबाबत निश्चित झाले नसताना पवार-गांधी यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

भाजपला रोखण्यासाठी आपल्याला हे करावेच लागेल; दलवाईंचे सोनिया गांधींना पत्र

युतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन वाद सुरु आहेत. दुसरीकडे काँग्रेसने शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी ऑफर दिली आहे. तर राष्ट्रवादीही विरोधी पक्षातच राहणार असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले. मात्र, अद्याप अंतिम निर्णय न झाल्याने सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Chief Sharad Pawar may be meet Congress president Sonia Gandhi