मोदी सरकारकडे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांची विशेष मागणी

सध्या देशात लसीकरण मोहिम वेगाने सुरू आहे
Jayant Patil
Jayant Patil
Updated on
Summary

सध्या देशात लसीकरण मोहिम वेगाने सुरू आहे. काही ठिकाणी मात्र लसतुटवडा आहे.

मुंबई: कोविन अ‍ॅपमधील (CoWin App) तांत्रिक अडचणींमुळे (Technical Glitches) लाखो लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे भारत सरकारने (Indian Government) लसीकरण (Vaccination) अ‍ॅपचे संपूर्ण विकेंद्रीकरण करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडे (Central Government) केली. (NCP Jayant Patil Requested Pm Modi Govt to Decentralize CoWin App Management)

Jayant Patil
इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे दुसऱ्या लाटेसाठी तयारी झाली नाही : जयंत पाटील

'कोविन-अ‍ॅप'मध्ये अनेक तांत्रिक त्रुटी येत आहेत. लॉगिन व OTP साठी विलंब होतोय, अशा अनेक तक्रारी येत आहेत. एका मध्यवर्ती अ‍ॅपवरून जवळपास १.३ अब्ज भारतीयांची वेळेवर नोंदणी होणे, हे अत्यंत आव्हानात्मक आहे. या परिस्थितीत महत्त्वपूर्ण अशा लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रणाली मर्यादित स्वरूपाची असून त्यातील त्रुटी या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत, असेही जयंत पाटील यांनी नमूद केले.

Jayant Patil
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदींमध्ये फोनवरुन चर्चा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्येक राज्याला स्वतंत्र अ‍ॅप तयार करून द्यावे किंवा महाराष्ट्र सरकारला स्वतःचे अ‍ॅप निर्माण करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केली होती. केंद्र सरकारने यावर तात्काळ विचार करावा, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com