esakal | इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे दुसऱ्या लाटेसाठी तयारी झाली नाही : जयंत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे दुसऱ्या लाटेसाठी तयारी झाली नाही : जयंत पाटील

कोविड सेंटरची वैशिष्ट्ये : -

- दोन सुसज्य हॉल

- आयसोलेशन हॉल आणि ऑक्सीजन हॉलची स्वतंत्र व्यवस्था

- तज्ञ डॉक्टरांची टीम

- रुग्णांसाठी ओपीडी

इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे दुसऱ्या लाटेसाठी तयारी झाली नाही : जयंत पाटील

sakal_logo
By
अशोक गव्हाणे

कात्रज : 'सध्या कोविडची स्थिती गंभीर असून, देशात ऑक्सिजनची कमतरता भासते आहे. परंतु, इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे दुसऱ्या लाटेची तयारी झाली नाही'. असे प्रतिपादन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी यांनी केले. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील प्रभाग क्र.३८मध्ये स्थानिक नगरसेवक प्रकाश कदम आणि प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतिक कदम यांच्या प्रयत्नाने उभारलेल्या कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कात्रज परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हाल होऊ नयेत म्हणून, प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतिक कदम व नगरसेवक प्रकाश कदम यांनी परिसरातील बॅडमिंटन कोर्ट व जिम्नॅशियम हॉल या महानगरपालिकेच्या वास्तूमध्ये व ऑक्सिजनच्या 90 बेडचे प्रशस्त कोविड सेंटर सुरू केले आहे. यामध्ये 40 ऑक्सिजन बेड आणि 50 आयसोलेशन बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे या झूम मीटद्वारे तर हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे पाटील, माजी नगरसेविका भारती कदम, डॉ. ओंकार खुने, सचिन भालेराव, डॉ. रंजना पवार, संतोष धुमाळ आदी उपस्थित होते.

हेही वाचा: खाकी वर्दीतली माया! आईच्या मृत्यूनंतर 2 दिवस उपाशी बाळाला महिला पोलिसांनी भरवला घास

तूर्तास कोविड सेंटरला आयसोलेशनची परवानगी मिळाली असली, तरी इमर्जन्सी ऑक्सिजनची गरज भासल्यास तात्काळ मिळण्याची सोय मिळवायची सोयही सेंटरमध्ये करण्यात आली आहे. शिवाय २२ ते २५ डॉक्टर व कर्मचाऱ्यांची टीमही प्रतिक कदम यांनी सेंटरसाठी उपलब्ध केली आहे. असून रुग्णांना पायऱ्या चढण्यासाठी दम लागू शकतो ही बाब लक्षात घेऊन कदम यांनी पहिल्या मजल्यावर रॅम्पवरून रुग्णांना जाण्यासाठीची सोय केली असल्याचा उल्लेख करत पाटील यांनी कदम यांचे कौतुक केले. पहिल्या लाटेनंतरच्या उद्रेकाला आपण नागरिक जबाबदार आहोत. आपल्या बेफिकीर वर्तनाने कोरोना वाढला असल्याचेही पाटील पुढे म्हणाले. तर, हे सेंटर सुरू करताना विरोधकांनी परवानगी लवकर मिळू नये म्हणून प्रयत्न केले असल्याचे नगरसेवक कदम यांनी आवर्जून सांगितले.

'अजितदादा आणि जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाने सुरू केलेल्या प्रतिक कदम यांचे हे कार्य वाखाणण्याजोगे आहे. प्रत्येक संकटात कदम कुटूंबीय नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असते. लसीकरणासाठी लसीचा तुटवडा पडतो आहे. जयंत पाटलांनी याचा पाठपुरावा करून आम्हाला मुबलक लस उपलब्ध करून द्याव्यात.

- सुप्रिया सुळे, खासदार, बारामती लोकसभा मतदारसंघ

हेही वाचा: चंद्रकांत पाटील काहीही बोलतात; जयंत पाटील यांचा टोला

loading image