esakal | EDच्या समन्सविरोधात एकनाथ खडसेंची मुंबई उच्च न्यायालयात धाव
sakal

बोलून बातमी शोधा

EDच्या समन्सविरोधात एकनाथ खडसेंची मुंबई उच्च न्यायालयात धाव

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे ईडीच्या समन्सविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

EDच्या समन्सविरोधात एकनाथ खडसेंची मुंबई उच्च न्यायालयात धाव

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे ईडीच्या समन्सविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ईडीनं अटकेची कारवाई करू नये यासाठी खडसेनं ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केल्याचं समजतंय. त्यावर ईडीनं देखील आपलं प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं आहे. 

एकनाथ खडसेंनी दाखल केलेल्या याचिकेत ईडीनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे. तसंच त्यात चौकशीचीही व्हिडिओग्राफी करण्याची मागणीही खडसेंकडून करण्यात आली आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तसंच तपासात सहकार्य करत असल्यानं कोणतीही कठोर कारवाई न करण्याची मागणीही खडसेंनी याचिकेत केली आहे. दरम्यान ईडी सारख्या केंद्रीय स्वायत्त संस्थांनी स्वतंत्रपणे तपास करायला हवा, असं मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. 

ईडी, आरबीआय, सीबीआय यांच्यावर कुठल्याही प्रकारे दबाव असता कामा नये. तसंच त्यांनी देशाचं सैन्य ज्याप्रकारे काम करतं तसं काम करायला हवं, असं न्यायालयानं म्हटलं आहे. 

नेमकं प्रकरण काय आहे?

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणात चौकशीसाठी एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावला आहे. गेल्या महिन्यात ३० डिसेंबरला ईडीकडून एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र खडसे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ईडीची चौकशी लांबणीवर पडली होती.

हेही वाचा- मोफत STनं प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी 'ही' बातमी महत्त्वाची

एकनाथ खडसे गेल्या 30 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर होणार होते.  कोरोनाची लागण झाल्यानं त्यांना क्वारंटाईन व्हावं लागतं होतं. पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीन खरेदी प्रकरणासह अन्य प्रकरणांमध्ये खडसे यांची चौकशी होणार आहे.

NCP leader Eknath Khadse filed petition bombay High Court against ED summons

loading image