Video : गाणं संजय राऊतांच्या मनातलं; गायलं मात्र जितेंद्र आव्हाडांनी 

टीम ई-सकाळ
Friday, 15 November 2019

मुंबई : राज्यात जे नवं राजकीय समीकरण उदयाला येत आहे. त्यात मोलाची भूमिका बजावलीय शिवसेना खासदार संजय राऊत यांनी. राऊत यांच्या पुढाकाराचं कौतुक करताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना एक गाणं डेडिकेट केलंय. काय आहे ते गाणं?

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

16-14-12 असा असेल, महाराष्ट्रातील पद वाटपाचा फॉर्म्युला 

राज्यातील शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे यांनी केली घोषणा

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस. यानिमित्तानं जितेंद्र आव्हाड यांनी राऊत यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या.  तत्पूर्वी, त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात आव्हाड यांनी म्हटलंय की, राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडीचे मुख्य सूत्रधार अर्थातच शरद पवार आहेत तर, या सगळ्याचं सूत्रसंचालन करण्याची महत्त्वाची भूमिका कोणी बजावली असले तर ती, संजय राऊत यांनी बजवालीय. या घडीला त्यांच्या मनात काय गाणं असेल? असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी किशोर कुमारचं एक गाणं राऊत यांना डेडिकेट केलंय. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader jitendra awhad sings song for sanjay raut