esakal | नरेश माझा जुना मित्र, उद्धव ठाकरेंनी न्याय दिला : जितेंद्र आव्हाड
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awhad

आज ठाण्याच्या महापौरपदी म्हस्के आणि उपमहापौरपदी पल्लवी कदम यांची निवड करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

नरेश माझा जुना मित्र, उद्धव ठाकरेंनी न्याय दिला : जितेंद्र आव्हाड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : माझी निष्ठा कोठे आहे? हे माझे नेते शरद पवार यांना माहित आहे असे स्पष्ट करतानाच ठाण्याचा महापौर शिवसेनेचा झाला. नरेश म्हस्के माझा जुना मित्र आहे. एका सामान्य कुटुंबातील आणि कडव्या शिवसैनिकाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री एकनाथ शिंदे यांनी न्याय दिला आहे याचा मला आनंद असल्याचे गौरवोद्‌गार राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज (गुरुवार) येथे काढले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

आज ठाण्याच्या महापौरपदी म्हस्के आणि उपमहापौरपदी पल्लवी कदम यांची निवड करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना आव्हाड यांनी खुशखुशीत भाषण करीत हास्याचे फुलोरे फुलविले.

आता वेळ जवळ आली, आज पवारांना भेटणार : संजय राऊत

महापौर म्हस्के यांच्याकडे पाहात ते म्हणाले, की नरेश तू माझा मित्र आहेस. यापुढे माझे जे ठराव येतील ते मंजूर करीत जा. एकनाथ शिंदेंकडे पाहत ते पुन्हा म्हणाले, शिंदेसाहेब नरेश माझा खूप जवळचा मित्र आहे. तो शिवसेनेचा कडवा कार्यकर्ता आहे. आमची मैत्री असूनही कधी आम्ही त्याच राजकारण आणले नाही. हा आदर्श मी माझे नेते शरद पवार यांच्याकडून घेतला आहे. पवारसाहेबांनी घालून दिलेल्या आदर्शावर आमची वाटचाल सुरू आहे. म्हस्के याच्या पक्षनिष्ठेबद्दल माझ्या मनात कोणतेही शंका नाही.

पहिली अडीच वर्षे शिवसेनेला अन् दुसरी अडीच वर्षे...?