तब्बल ८० हजार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचं लक्ष्य, ऑनलाईन महारोजगार मेळाव्यात करा अप्लाय

तब्बल ८० हजार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचं लक्ष्य, ऑनलाईन महारोजगार मेळाव्यात करा अप्लाय

मुंबई , ता. 7: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाईन राज्यव्यापी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या रोजगाराच्या माध्यमातून राज्यात 80 हजार रोजगार देण्याचे लक्ष्य ठरवलं असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

कोरोना काळात देशात बेरोजगारीचे संकट निर्माण झाले होते. यामुळे अनेक लोकांच्या नोकर्‍याही गेल्या. रोजगारासाठी लोकं अडचणीत असतानाच राष्ट्रवादीने हे पाऊल उचलले आहे. यामध्ये राज्यसरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

आजपासून 'महास्वयंम' पोर्टलवर याबाबतची नोंदणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ही नोंदणी 12 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. 12 डिसेंबरला जे लोकं नोंदणी करतील किंवा नोंदणी झालेले आहेत त्यांना ही संधी उपलब्ध होणार आहे.

आजपासून ज्या रोजगार देणार्‍या कंपन्या आहेत त्यांची नोंदणी सुरू झाली आहे. आज सकाळपर्यंत 214 कंपन्यांनी माणसांची गरज आहे म्हणून नोंदणी केली आहे. 40 हजार संधी आता पोर्टलवर उपलब्ध आहेत. त्यामध्ये शहरी भागात 23 हजार रोजगार, ग्रामीण भागात जवळपास 92 कंपन्यांनी 17 हजार नोकर्‍या उपलब्ध केल्या आहेत. त्यामध्ये बँकींग, फायनान्स, इंशुरन्स, इंडस्ट्री, सिक्युरिटी गार्ड, सेल्समार्केटींग, इलेक्ट्रॉनिक्स, टेक्स्टाईल, ऑटोमोबाईल अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे. 12 डिसेंबरपर्यंत सव्वा लाख रोजगार पोर्टलवर उपलब्ध होतील. या सर्वांची छाननी होऊन  मेसेजद्वारे मुलाखतीला बोलावले जाईल किंवा ऑनलाईन मुलाखती घेतल्या जातील असेही सांगितले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून 80  हजार तरुणांना रोजगार मिळतील असे उद्दिष्ट ठेवून हा कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. यासाठी पक्षाने एक वेबपोर्टल तयार केले आहे. त्या पोर्टलवर सोशल मीडियाच्या माध्यमातून rojgar.mahaswayam.gov.in, yodhaat80.org या पोर्टलवर क्लीक केल्यावर रजिस्ट्रेशन होणार आहे. शिवाय यावर माहिती भरुन लोक रोजगार मेळाव्यात सहभागी होवू शकतात.

मुंबई, महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात आणि तालुक्यात युवकचे कार्यकर्ते आपले इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन सरकारच्या अधिकार्‍यांना सहकार्य करणार आहेत. 80 हजार रोजगार देण्याचं काम कौशल्य विकास व उद्योजकता विभाग करेल व पक्ष त्यांना सहकार्य करेल. कोरोना काळात बेरोजगारी दूर करण्यासाठी एक मोठा उपक्रम या राज्यात राष्ट्रवादीने घेतला असून या उपक्रमाने तरुणांना रोजगार नक्की मिळेल असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, संजय तटकरे, क्लाईड क्रास्टो, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे आदी उपस्थित होते.

NCP leader nawab malik shared info about maha rojgar melawa targeting employment to 80 thousand people

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com