"दाढीवाला चोर कोण'.. त्याचं नाव आशिष शेलारांनी सांगावं"

"दाढीवाला चोर कोण'.. त्याचं नाव आशिष शेलारांनी सांगावं" नाना पटोले यांनी केलेला आरोप माहितीच्या अभावी केल्याचं दिसतं... NCP Nawab Malik slams BJP Ashish Shelar Congress Nana Patole CM Yogi Aditya Nath
Nawab Malik
Nawab Maliksakal media

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका विषयावर जे भाष्य केले, त्यानंतर 'चोर के दाढी में तिनका' असं वक्तव्य भाजपचे माजी मंत्री आशिष शेलार यांनी केलं होतं. पण त्यांनी 'दाढीवाला चोर कोण'.. त्याचं नाव काय? हे सांगितले पाहिजे. शरद पवार यांनी २०१३ साली युपीए सरकारच्या काळात सहकाराला घटनात्मक सूचीमध्ये टाकून स्वायत्तता देण्याचे काम केले. परंतु या स्वायत्ततेवर कोण गदा आणत असेल तर त्यावर नंतर बोलू, मात्र कायद्याचं राज्य असतं. कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही. एखादा व्यक्ती मंत्री झाला म्हणून सर्व अधिकार मिळतात असं नाही. त्यामुळे भाजपच्या लोकांनी जबाबदारीने बोलावं, असा इशारा असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत लगावला. (NCP Nawab Malik slams BJP Ashish Shelar Congress Nana Patole CM Yogi Aditya Nath)

Nawab Malik
Covid-19: मुंबईत गेल्या 24 तासांत 500 पेक्षाही कमी नवे रूग्ण

योगी सरकारच्या दोन मुलांच्या पॉलिसीबद्दल-

"उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार 'दोन मुलांचे' धोरण आणत आहे. हे धोरण महाराष्ट्रात २००० मध्येच तयार करण्यात आलेले आहे. मात्र योगी आदित्यनाथ 'दोन मुले' हे धोरण आणून संपूर्ण देशात गोंधळ घालत आहेत. त्यांनी दोन मुलांऐवजी भाजप नेत्यांच्या वक्तव्यानुसार जास्त मुलं जन्माला घालावी हे धोरण आणले पाहिजे. दोन मुलांच्यावर मुल झालं तर त्या व्यक्तीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा शासकीय लाभ घेता येत नाही हे महाराष्ट्रात धोरण ठरलेले आहे. भाजपमध्ये असे अनेक नेते आहेत त्यांची मुलं नाहीत. किंवा भाजपची मातृसंस्था RSS मध्येही असे लोक आहेत ज्यांना मुलंच नाहीत. दोन मुलं ही पॉलिसी बर्‍याच राज्यात आहे. त्यामुळे योगींनी 'मुलंच नकोत' ही पॉलिसी अंमलात आणली पाहिजे. कारण मुलं नाहीत त्यांना प्रोत्साहन मिळेल" असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.

Nawab Malik
मुंबई लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे सकारात्मक

नाना पटोले यांच्या आरोपांवर-

"कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहितीच्या अभावी आरोप केला आहे. नाना पटोले यांनी त्यांच्या हालचालीवर व कार्यक्रमावर पहारे बसवण्यात आले आहेत, ही माहिती गृहमंत्रालय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना पुरवते असा आरोप केला आहे पण तो योग्य नसावा. राज्यात सरकार कुणाचेही असो राजकीय कार्यक्रम, आंदोलने, बैठका किंवा महत्त्वाचे नेते, मंत्री त्यांच्या हालचालीची नोंद ठेवण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक असतं. ते सर्व पक्षांची माहिती संकलित करून तो खात्यांतर्गत रिपोर्ट करत असतात आणि संकलित माहिती गृहखात्याकडे जमा होते. ही सिस्टम नाना पटोले यांना माहीत नसेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चौहान यांच्याकडून माहिती करून घेतली पाहिजे. जर नाना पटोले यांना वाटत असेल की, त्यांच्या कार्यक्रमाला पोलीस नको, त्यांच्या नेत्यांना, मंत्र्यांना पोलीस बंदोबस्त नको तर तसा अर्ज केला तर त्याबाबतीत गृहमंत्री काय तो निर्णय घेतील", असेही नवाब मलिक म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com