

Avinash Deshmukh
ESakal
बदलापूर : वाढीव वीज बिलांविरोधात आवाज उठवला म्हणून राष्ट्रवादीचे पदाधिकारी अविनाश देशमुख यांच्याविरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महत्वाचं म्हणजे आपण कोणत्याही कर्मचाऱ्यावर हात उगारलेला नसताना आपल्याविरोधात मारहाणीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप अविनाश देशमुख यांनी केलाय. यातून महावितरण अधिकारी आणि पोलीस प्रशासनात काही साटंलोटं आहे का? असा सवालही उपस्थित होतोय.