esakal | PowerAt80 : "राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी आधुनिकता आणि विज्ञानाच्या दिशेने गेलं पाहिजे" : शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

PowerAt80 : "राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी आधुनिकता आणि विज्ञानाच्या दिशेने गेलं पाहिजे" : शरद पवार

बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला भक्कम घटना दिली, आंबेडकर यांनी विज्ञानाचा आधार घेतला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी देखील आधुनिकता आणि विज्ञानाच्या दिशेने गेलं पाहिजे.

PowerAt80 : "राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी आधुनिकता आणि विज्ञानाच्या दिशेने गेलं पाहिजे" : शरद पवार

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, अध्यक्ष शरद पवार यांचा आज जन्मदिवस. शरद पवार यांनी वयाची ८० वर्ष पूर्ण केली आहेत. या निमित्ताने मुंबईतील यंशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या शेवटी शरद पवारांनी सर्व उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं आणि सर्वांचे आभारही मानलेत. सध्याच्या समाजकारणात केवळ शाहू, फुले, आंबेडकर यांचा उल्लेख करून चालणार नाही, तर तशी मानसिकता देखील तयार करायची गरज असल्याचं शरद पवार यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.

"गेल्या ५० ते ५५ वर्षांपासून समाजकारणात आणि राजकारणात मी काम करत आहे, महाराष्ट्रातल्या जनतेनं मला काम करण्याची संधी दिली. सामाजिक जीवनात काम करत असताना शेवटच्या माणसाच्या हिताचा जेंव्हा तुम्ही विचार करता, तेंव्हा तुम्हाला पुढचा रास्ता कोणता असावा याची स्पष्टता येते. आपण जागृत राहून काम केलं पाहिजे असं शरद पवार यांनी आपल्या भाषणात अधोरेखीत केलं.

हेही वाचा :  प्रताप सरनाईकांकडे आढळलं पाकिस्तानी क्रेडिट कार्ड ? संजय राऊतांनी त्यावर दिली प्रतिक्रिया

त्या काळातील गांधी नेहरूंचे विचार घेऊन काम केलं पाहिजे आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे ही आईची शिकवण होती. आईचा हा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा ठरला. महात्मा फुले यांनी आधुनिकतेची कास धरली, आपण फुले यांना महात्मा मानतो कारण त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. सध्याच्या समाजकारणात काम करताना केवळ शाहू, फुले, आंबेडकर यांचा केवळ उल्लेख करून चालणार नाही. तर लोकांमध्ये तशी मानसिकता तयार करायची आहे, असं शरद पवार आपल्या भाषणात म्हणालेत. 

Powerat80 : डॉक्टरांनी सांगितलं होतं, "तुमच्याकडे केवळ ६ महिने शिल्लक आहेत"; यावर शरद पवार म्हणाले होते...

बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला भक्कम घटना दिली, आंबेडकर यांनी विज्ञानाचा आधार घेतला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी देखील आधुनिकता आणि विज्ञानाच्या दिशेने गेलं पाहिजे. त्या विचारांची पिढी तयार करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असं शरद पवार म्हणाले आहेत.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सोहळा आयोजित केला होता. पाहा संपूर्ण सोहळा. 

मुंबई, नवी मुंबई, ठाणे , कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, वसई विरारच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा  ।  Marathi News From Mumbai

NCP party workers should walk on the path of modernity and science shard pawar

loading image