Sharad Pawar group announced election officers for BMC Election
ESakal
मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने निवडणूक प्रभारी जाहीर केले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज ही घोषणा केली असून, पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर पुणे तर युवा नेते आमदार रोहित पवार यांच्यावर मुंबईची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नियुक्त्यांमध्ये पक्षाने प्रस्थापित नेत्यांना आणि खासदारांना मैदानात उतरवून आपली रणनीती स्पष्ट केली आहे.