शिवसेनेकडून पलटवार? नील सोमय्यांची अटकपूर्व जामीनासाठी धाव

Kirit-Somaiya
Kirit-SomaiyaSakal

शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांची सकाळपासून आयकर विभागाने चौकशी सुरू केली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्ता लपवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. छापेमारी सुरू असताना सोमय्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन जाधव-ठाकरे कुटुंबीय यांनी हवालामार्फत पैसा वळवल्याची माहिती दिली. सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे याचे हवाला एजंट एकच असल्याचंही सांगितलं. (Neil Somaiya Seeks pre arrest bail in High Court)

दरम्यान, सूडबुद्धीने कारवाया होत असल्याची टीका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपला जशास तसे उत्तर देण्याची मागणी होत आहे. केंद्रीय यंत्रणा भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप महाविका आघाडीतील नेत्यांनी केलाय. त्यामुळे सोमय्यांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा अंतर्गत गोटात आहे. सोमय्या दिल्लीत शिवसेनेवर वार करत असताना मुंबईत नील सोमय्यांनी कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली. (Neil Somaiya Nicon Infrastructure)

Kirit-Somaiya
'जाधवांकडे बॅगा भरून पैसे आले होते, यासाठी मी वित्त मंत्र्यांना भेटलो'

कोर्टात सोमय्यांच्या प्रकरणावर सुनावणी झाली नाही. त्याच प्रमाणे 28 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलंय पीएमसी बँक घोटळ्याचे पैसे निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपनीत गुंतवल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. यामध्ये नील सोमय्यांचा हात असल्याचे पुरावे राऊत देणार आहेत. निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी सोमय्या यांच्या मालकीची आहे.

पीएमसी बँकेच्या घोटाळ्यातील आरोपी राजेश वाधवान याचे नील सोमय्या यांच्याशी संबंध असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. या प्रकरणी सोमय्या बाप-बेटे तुरुंगात जातील, असं विधानही राऊतांनी केलं. याच प्रकरणी आता नील सोमय्या यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com