मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच! आज 'इतके' नवे रुग्ण; जाणून घ्या आजची कोरोनाची आकडेवारी..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

मुंबईत आज 1180 नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे  एकूण रुग्णसंख्या 82,814 झाली आहे.

मुंबई: मुंबईत आज 1180 नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे  एकूण रुग्णसंख्या 82,814 झाली आहे. तर आज 68 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 4,827 वर पोचला आहे. मात्र मुंबईत आज एका दिवसात 1071 रुग्ण बरे होऊन घरी गेले.         

हेही वाचा: कोरोनाची अशीही धास्ती; मुंबईहून येणाऱ्या रेल्वे, विमाने आमच्याकडे पाठवू नका... 

मुंबईत आज नोंद झालेल्या 68 मृत्यूंपैकी 51 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 46 पुरुष तर 22 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी तीन जणांचे वय 40 चयाखाली होतेे. तर 41 रुग्ण 60 वर्षा वरील होते तर 24 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.                    

संशयित रुग्ण आढळणे सुरूच असून आज एकूण 966 नवे संशयित रुग्ण सापडले असून  आतापर्यंत 57,487 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 1,071 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत  53,463 रुग्णांना घरी सोडण्यात आले.       

हेही वाचा: मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर 18 दिवसांमध्ये तब्बल 'इतक्या' कर्मचाऱ्यांचा लोकल प्रवास..   

मुंबईत आजारातून बरे झालेल्या रुग्णांचा दर हा 64 टक्के इतका आहे. तर 3 जून पर्यंत एकूूूण 3,49,913 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 27 जून ते 3 जुलै दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 1.71 इतका आहे. तर रुग्ण दुपटीचा दर हा 41 दिवसांवर गेला आहे.
new 1180 corona patients in mumbai  read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 1180 corona patients in mumbai read full story