

New Mumbai Pune Greenfield Expressway
esakal
Mumbai Pune New Highway : मुंबई आणि पुणे या दोन महानगरांमधील अंतर कमी करण्यासाठी आठ पदरी नवीन ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे उभारण्याची तयारी सुरू आहे. सुमारे १३० किलोमीटर लांबीचा हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते पुणे प्रवास अवघ्या ९० मिनिटांत करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे १५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, सध्याच्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.