मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच; आज तब्बल 'इतके' नवे रुग्ण..जाणून घ्या आकडेवारी  

corona
corona

मुंबई : मुंबईत आज 1308 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 91,457 झाली आहे. तर आज 39 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 5,241 वर पोचला आहे. मात्र मुंबईत आज एका दिवसात 1497 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

हेही वाचा: मोठी बातमी! गणेशोत्सव मंडळांसाठी गृहविभागाकडून मार्गदर्शक तत्त्वे जाहीर; वाचा काय आहेत नियम .. 
                                                      
मुंबईत आज नोंद झालेल्या 39 मृत्यूंपैकी  32 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 25 पुरुष तर 14 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी  तिघांचे वय 40 च्या खाली होतेे. तर 26 रुग्ण 60 वर्षा वरील होते तर 10 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.                         

मुंबई संशयित रुग्ण आढळणे सुरूच असून आज एकूण 931 नवे संशयित रुग्ण सापडले असून आतापर्यंत 63,667संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 1497 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत  63,431 रुग्णांना घरी सोडण्यात आले. 

                                                               
मुंबईत आजारातून बरे झालेल्या रुग्णांचा दर हा 69 टक्के इतका आहे. तर 10 जुलै पर्यंत एकूूूण 3,85,453 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 4 जुलै ते 10 जुलै दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 1.39 इतका आहे. तर रुग्ण दुपटीचा दर हा 50 दिवसांवर गेला आहे.

संपादन : अथर्व महांकाळ 

new 1308 corona patients in mumbai today 
             

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com